पान:Paripurti.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४ / परिपूर्ती
 


चेष्टेला न जुमानता तुला मुळीच न मारणाच्या माझं प्रेम जास्त?" आमच्या हशात आईचे दु:ख कोठच्या कोठे नाहीसे झाले. पण भाऊ एवढ्यावर थोडेच थांबतात! "पण गणू, आम्ही बायकोला मारली म्हणजे आमचे प्रेम नाही असं का तुझं म्हणणं?" “छे:! मी कुठे तसं म्हणतोय? तू तर वहिनीच्या मुठीत होतास, आणि तिला मारली नसतीस तर बरोबरीच्या मुलांत वावरायची सोय नव्हती हे मला कळतं रे! पण ह्या हल्लीच्या पोराना अकलाच नाहीत. आणि त्यांचं पाहन हिला पण काहीतरी सुचतं झाल!"
 आमची बैठक मोडली, व आम्ही फिरावयास निघालो तो प्रेमाचा आणखी एक सनातन रीत मला दिसायची होती. रस्त्यालगतच एक झापड होते. अंगणात बरीच चिलीपिली खेळत होती. त्यातलेच एकजण, असेल चार-पाच वर्षांचे, खेळत-खेळत रस्त्यावर आले. त्याची आई अगणातूनच पाहत होती. इतक्यात एक टांगा आला. मुलाच्या अलीकडे लगाम खचून टांगा थांबला. अंगणातली बाई धावतच पुढे आली. तिने पोराच्या बखोटीला धरून त्याला खस्सदिशी ओढले, दोन-चार रट्टे दिले व म्हटल, "पटकी झाली मेल्याला! कशाला तडफडायला रस्त्यावर गेला होतास रे? आई भवानीची खैर म्हणून वाचलास!"