पान:Paripurti.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परिपूर्ती / १३
 

मधल्या दिवाणखान्यात गप्पांना रंग भरला होता. संध्याकाळचे बेत चालले होते. एक भाऊन् वहिनी सिनेमाला जाणार होती; चवथ्याची बायको बाळंत होती तिला भेटायला तो दवाखान्यात जाणार होता. आम्ही दोघे फिरायला जाणार होतो. वडील जाणार होते पत्ते खेळायला आणि आई जाणार होती देवदर्शनाला. आईच्या मनात गेले दोन दिवस काही तरी खळबळ चालली होती. ती जराशी कुरकुच्या आवाजात बोलता बोलता म्हणाली, "काय अगदी एक दिवस दवाखान्यात भेटायला गेलं नाही तर ह्यांना चालत नाही!" वडील म्हणाले, "अग, जाऊ दे ग, माझ्या गाडीतून जाईल. मी जाईन आज पायीच. थोडे फिरणंही होईल." आई उसळूनच म्हणाली, "हो, आता त्यांची कौतुकं चालली आहेत. काय म्हणे दोघं सिनेमाला जाताहेत! मला कधी एक दिवस बरोबर नाटकाला नेलं नाहीतः दोघं फिरायला जाताहेत! कधी मी विचारलं, 'येता का?' की शिपायाला म्हणता; 'बाईसाहेबांच्या बरोबर जा.' मी बाळंत होत असे तेव्हा कधी दिवस दिवस माझी विचारपूस केली नाहीत, कधी आत येऊन मला पाहिले नाहीत! फार तर उंबरठ्यात उभे राहून दुरूनच 'काय? सर्व ठीक आहे ना?' एवढे विचारायचे." बोलता-बोलता आईचा गळा भरून आला. जन्मभर झालेल्या अवहेलनेच्या आठवणीने तिचे मन भरून आले होते. आम्ही सर्व हा प्रकार पाहून ताबडतोब चुपचाप झालो. पण माझे वडील लगेच म्हणाले, "अग, तुझी ना तरी काय आहे? ह्या पोरांच्या वागण्यानं तुला वाटतं, काय बायकोवर ह्यांचे प्रेम आहे म्हणून! आजकालची सर्वजणं करतात ते ती करतात. मी जर तुझ्याजवळ बसन राहिलो असतो. नाहीतर फिरायला गेलो असतो, तर तूच लोक हसतात म्हणून कुरकुरली असतीस. चार लोकाची रीत तीच आपली ठेवावी लागते. पण मी तर रूढीविरुद्ध वागून माझे प्रेम सिद्ध आहे." आम्ही सर्वजण वडिलांच्या तोंडाकडे पाहू लागलो. शेजारी माझे चुलते बसले होते, त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, "भाऊ, तू सांग पाहू. तू वहिनीला मारलं आहेस की नाही?" भाऊ म्हणाले, "हो! दोन-चारदा मारली असेल." वडील पुढे म्हणाले, “काय गं, तात्या न दादा तर तुझ्यादेखत बायकांना मारीत होते ना? मी साच्या जन्मात एकदा तरी हात गारला आहे तुझ्यावर? दादा, तात्या, भाऊ, सर्व मला बायल्या म्हणत. मी कधी तुला मारलं नाही. मग चार लोक बायकांच्या पुढे पुढे करतात करणाच्या ह्या मुलांचं बायकांवरील प्रेम अधिक का चार लोकांच्या