पान:Paripurti.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६
सुप्त इच्छा

 ती नि मी ओळीतच बसत असू. मी
नवीनच काम करू लागले होते, ती माझ्याआधी
वर्षभर तेथे होती. आमच्यापुढे दर आठवड्याला
निरनिराळे खटले यावयाचे व आम्ही दोघींनी
मॅजिस्ट्रेटच्या साहाय्याने ते चालवायचे असे
चालले होते. ती होती एक इंग्रज मिशनरी बाई.
हिंदुस्थानात तिचे पंचवीस वर्षे आयुष्य गेले होते.
मूळच्या गोऱ्या रंगाला पिवळसर चामड्याची
झाक आली होती. आपण जवळजवळ हिंदीच
आहोत हे दाखविण्यासाठी ती आपल्या पांढऱ्या
केसांच्या सुपारीएवढ्या अंबाड्यावर मोठी
कडक निशिगंधाची वेणी घालायची, कधी कुंकू
लावायची, कधी लुगडेसुद्धा नेसून यायची. ती
कुमारी होती हे सांगायला पाहिजे. पहिल्या-
पहिल्याने सगळे सुरळीत चालले होते- सुरळीत
म्हणजे मी तिच्या भानगडीत न पडता माझ्यापुढे
आलेल्या गोष्टींचा निकाल लावीत असे; पण पुढे
पुढे ते होईना. ती ख्रिस्ती- सर्व कोकरांवर करडी
नजर असलेल्या धर्माची प्रसारक- आणि ज्या
धर्माला सर्वसाधारण प्रमाण लावणे अशक्य आहे
अशी हिंदू मी होते. संन्यासधर्माचा निदान तोंडाने

उदोउदो करणाऱ्या धर्माची ती, तर गृहस्थाश्रमाचे