Jump to content

पान:H&H combain/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन तत्त्वज्ञानी. जेवणाच्या जागी जमे, कैंट आपला रुमाल बाहेर काढून सर्वांना सुरुवात करण्यास सांगे, व आपणहि जेवावयास सुरुवात करी. जेवण बहुधा तीन वाढी असे, व ते सुमारे तीन व केव्हां केव्हां चार तासहि चाले. जेव णाच्या वेळी पुष्कळ वेळां राजकीय विषयांवर संभाषण होई. कॅट हा वर्तमानपत्रांचा मोठा भोक्ता होता, व वर्तमानपत्रे आणणाऱ्या पोस्टाकडे मोठ्या आस्थेने त्याचे डोळे लागलेले असत. त्या वेळी युरोपांत फ्रान्समधल्या राज्यक्रांतीची खळबळ चालू असे, व त्याच्या आधी अमेरिके. तील स्वतंत्रतेकरितां युद्ध झाले, त्याची खळबळ चालू असे. कॅटचा आढा नेहमी स्वातंत्र्याकडे व प्रजापक्षाकडे असे. जेव्हां फ्रान्समध्ये प्रजा सत्ताक राज्य स्थापन झाल्याची बातमी त्याने ऐकली, तेव्हां तो म्हणाला, "आज माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले ! आतां मी सुखाने मरेन । जेवण आटोपल्यावर म्हणजे ४ वाजल्यानंतर कॅट फिरावयास निया पहिल्यांदा तो इतर लोकांबरोबर फिरावयास जाई, पण पुढे पुढे ता एकटा फिरावयास जात असे, कारण नाकांतन श्वासोच्छ्वास केल्याने रोगजंतु पोटांत जाणार नाहीत, असें त्याला वाटे. व म्हणून तो फिरताना व बोलतांना तोंड मिटन चालत असे. त्याचा दुसरा एक नियम तो हा की, केव्हाही अंगाला घाम येतां कामा नये कॅट हा नाजूक प्रकताचा होता; घट्टाकट्टाही नव्हता, किंवा तो नेहमी आजारी असे, असेही नाही. तरी पण खाण्यापिण्यासंबंधी व वागण्यासंबंधी बाताबेताने राहून तो इतकी वर्षे जगला. रपेट करून आल्यावर बारीकसारीक कामे करा वयाची, नवीन पुस्तकें चाळावयाची व वर्तमानपत्रे पहावयाची, काळोख पडल्यावर तो आपल्या आवडत्या विषयावरील प्रश्नासंबंधी विचार करात बसे. रात्री दहांच्या सुमाराला तो निजावयास जाई. ही त्याची दिनचया दिवसानुदिवस, मासानुमास व वर्षानुवर्ष चाले. त्याच्या या व्यवसायासंबंधी एक मजेदार गोष्ट सांगतात. कट हा आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसन विचार करी व मनाचा होण्याकरता आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या एका देवळाच्या "