पान:Ganitatalya gamatijamati.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ओली - सुकी
८५

टोप्यांना त्यांचेच नंबर देऊ मग दारूड्यांचे नंबर वर आणि खाली टोप्यांचे असे एक टेबल तयार करता येईल.

 इत्यादि........

 ह्या तक्त्यात टोप्यांच्या वरीलप्रमाणे २४ प्रवेशिका (एंट्रिज) असतील (वर फक्त ३ दिल्या आहेत.) अशा किती प्रवेशिका आहेत ज्यात कुठल्याही दारूड्याखाली त्या नंबराची टोपी नाही? पहा मोजून ! उत्तर आहे ९. म्हणजे असे घडण्याची संभाव्यता आहे ९/२४ म्हणजे ३/८.

बफाँचा ‘सुईचा प्रश्न :

 बफाँ (Buffon) नावाच्या गणितज्ञाने एक गमतीदार प्रश्न तयार केला त्याचं थोडक्यात विवरण देत आहे.

 चित्रात दाखविल्याप्रमाणे एका मोठ्या कागदावर, ठराविक अंतरावर समांतर रेघा मारा. दोन शेजारच्या रेघांच्या मधल्या अंतराच्या निम्म्या लांबीची एक बारीक सुई किंवा काडी घ्या. आणि नाणेफेकीप्रमाणे - यादृच्छिक पद्धतीने - म्हणजे सुई कशी पडावी इकडे लक्ष न देता, ती सुई फेका. ती सुई कागदावर पडली की एखाद्या रेघेवर तरी पडेल किंवा दोन रेघांच्या मधल्या भागात अलगद पडेल. तर ही सुई रेघेवर (कुठल्याही) पडण्याची संभाव्यता काय?