पान:Ganitatalya gamatijamati.pdf/8

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


Nuvola apps important.svg मराठी विकिस्रोतसाठी ह्या लेख पान/विभागाची विकिस्रोत उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिस्रोत चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिस्रोत सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

[[वर्ग:जून साचा:देवनागरी मध्ये वगळावयाचे लेख | साचा:देवनागरी]] पानाचा क्रम चुकीचा. पान क्र. ६ ची पुनरावृत्ती झाली आहे


२. सात पूल आणि दोरीची गाठ

 खालील आकृती पेन्सिलीने गिरवता येईल काय? मात्र पेन्सिल एकदा त्या आकृतीवर टेकवली की उचलायची नाही आणि कुठलीही रेषा दोनदा गिरवायची नाही अशी अट. लेखांक १ मध्ये हा प्रश्न विचारला होता.

Ganitatalya gamatijamati.pdf

चित्र क्रमांक १

 या प्रश्नाचे उत्तर असं आहे की, अशा तऱ्हेने ही आकृती गिरवणे शक्य नाही! तुम्ही देखील अनेक प्रयत्न करून हाच निष्कर्ष काढला ना?

 हे विधान गणिताने सिद्ध करता येतं - पण ते प्रमेय अवघड आहे. मात्र त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. तो असा :

कोनिग्सबर्गचे सात पूल :

 युरोपच्या नव्हे, पण गणिताच्या इतिहासात गाजलेलं एक लहानसं गाव 'कोनिग्सबर्ग. तिथे नदी होती आणि तिच्यावर सात पूल होते. हे पूल त्या नदीतल्या दोन बेटांना आणि दोन्ही तीरांना एकमेकांशी जोडत होते. त्यांची रचना चित्र क्रमांक २ मध्ये दाखवली आहे.