पान:Ganitatalya gamatijamati.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
गणितातल्या गमती जमती



म्हणाला. “आता नव्या संख्येत १ मिळवून तिला त्यापूर्वीच्या संख्येने भागा म्हणजे चौथी संख्या मिळेल.”

 २ + १ = ३, ३ ÷ ९ = १/३ → ५, ९, २, १/३

 "पुन्हा हेच कर” साधूने सांगितले, "असं किती वेळा करायचं?” पोराने विचारलं. कारण भागाकार करून तो दमायला लागला. "कर दोन वेळा आणि बध गंमत” साधूने आश्वासन दिलं.

 १/३ + १ = ४/३, ४/३ ÷ 2 = २/३ →
  ५, ९, २, १/३ , २/३
 २/३ + १ = ५/३, ५/३ ÷ १/३ = ५ →
  ५, ९, २, १/३, २/३, ५

 अरेच्या ! ह्या आकड्यांच्या मालिकेतली ६ वी संख्या पहिल्या संख्येइतकीच आली. कुठल्याही दोन संख्या घेतल्या तरी असंच होतं. करून पाहा." साधू म्हणाला.

(३)

 साधूने ७ कार्डे बाहेर काढली. (ती सोबतच्या चित्रात पहा) त्यावर आकडे लिहिलेले असून काही ठिकाणी भोकं होती येथे दाखविल्याप्रमाणे.

 कार्ड नं. १ प्रमुख कार्ड असून त्यावर १-२० आकडे होते. बाकीच्या सहा कार्डावर बॉर्डरवरच काही आकडे होते. त्याने ती कार्डे राजाकडे दिली (प्रमुख कार्ड स्वतःजवळ ठेवलं) आणि म्हणाला,

 “मनात १ ते २० पर्यंतची कुठलीही संख्या घेऊन ती ज्या कार्डावर असेल, ती कार्डे मला द्या.” राजाने तीन कार्डे त्याला दिली.