पान:Ganitatalya gamatijamati.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३. आकड्यांचे चमत्कार

 एका मागासलेल्या देशात गणितीय शिक्षणाला कमी लेखलं जात असे. राजापासून अगदी सामान्य प्रजाजनापर्यंत सर्वच ह्या विषयाला घाबरून असत. एकदा राजदरबारात एक साधू आला. तो म्हणाला, “मी काही आकड्यांचे चमत्कार करून दाखवतो.”

 “अबब ! आकडे !" सर्व लोक हादरले. पण चमत्कार पाहायला त्यांनी दरबारात गर्दी केली.

 "लोक हो ! तुम्हीं गणिताला घाबरता म्हणून मी अगदी सोपे चमत्कार दाखवणार आहे." साधूने सुरुवात केली. समोरच्या एका सरदाराला उद्देशून तो म्हणाला, "कुठलीही तीन अंकी संख्या सांग, जिचा पहिला आणि तिसरा आकडा तोच नसेल.” पुष्कळ डोकं खाजवून सरदारसाहेब म्हणाले

 ३ ५ ८

 ती उलटी कर !” साधू म्हणाला. "सोपं आहे" सरदाराने लगेच उत्तर दिलं, ८ ५ ३.

 " आता ह्या दोन संख्यांपैकी मोठीतून छोटी वजा कर.” साधूने सांगितले.