पान:Ganitatalya gamatijamati.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७. गोळाफुलीचा खेळ

 बहुतेकांना हा खेळ परिचित असेलच. चित्र क्रमांक १ मध्ये दिलेल्या आकृतीत नऊ भाग (सेल) आहेत.

Ganitatalya gamatijamati.pdf
चित्र क्र. १

 दोघा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी क्रमाक्रमाने एकेका सेलमध्ये x किंवा ० भरायचे : एकाने फुली, दुसऱ्याने गोळा. जो एका सरळ रेषेत x किंवा ० प्रथम काढून दाखवेल तो जिंकला. चित्र क्र. १ मध्ये फुलीवाल्याने डाव जिंकला आहे. अर्थात पुष्कळ वेळा हा सामना अनिर्णित राहतो. कारण पारस्परिक विरोधामुळे कोणालाच स्वतःचे चिन्ह एका सरळरेषेत काढता येत नाही.

वरील आकृतीत एकंदरीत ८ सरळ रेषा आहेत - तीन उभ्या, तीन आडव्या आणि दोन कर्णाच्या, एका मोठ्या चौकोनाचे तीन बाय तीन