पान:Ganitatalya gamatijamati.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दोनच पर्याय : सत्य किंवा असत्य
२५


विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्रे पाठवली :

 ह्या शाळेत काही विलक्षण व्रात्य विद्यार्थी आहेत. तुम्हाला तुमचा मुलगा व्रात्य असल्याची खात्री असल्यास शाळेत येऊन प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर तुम्ही त्याला समज द्यावी.”

 गंमत म्हणजे प्रत्येक पालकाला इतर मुलांची ते व्रात्य आहेत का नाही याची माहिती होती. पण स्वतःच्या मुलाचीच खात्री नव्हती. पण दुसऱ्याला विचारणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. म्हणून त्यांनी तर्कशास्त्राचा उपयोग केला.

 पहिल्या दिवशी कोणीच पालक आपल्या मुलांना शिक्षा करायला आले नाहीत.

 दोन दिवस झाले - तिसरा दिवस गेला - काही घडलं नाही.

 मास्तरलोक हेडमास्तरांकडे गेले, “अहो, तुमच्या पत्राचा काही उपयोग झालेला नाही. पालकांनी दखल घेतली नाही आणि व्रात्यपणा तर जोरात आहे.”

 “जरा दमाने घ्या ! पालकलोक हुशार आहेत. योग्य वेळी आपलं कर्तव्य बजावतील." हेडमास्तर आत्मविश्वासाने म्हणाले.

 आणि खरोखरच दहाव्या दिवशी दहाही व्रात्य मुलांच्या पालकांनी येऊन आपल्या रत्नांचा योग्य तो समाचार घेतला !

 त्यांनी कसा तर्क केला असेल? ते इतके दिवस का थांबले?

 उत्तरे लेखांक ९ मध्ये पहा.

♦ ♦ ♦