पान:Ganitachya sopya wata.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



AB ही दिलेली लांबी कंपासमध्ये घेऊन A वर कंपासचे टोक ठेवून एका रेषेवर AB एवढ्या अंतरावर कंस काढा व दुसऱ्या रेषेवर AC एवढ्या अंतरावर कंस काढा. मग त्या दोन्ही रेषांवर B आणि C हे बिंदू मिळतील. आता ABC हा त्रिकोण दिलेल्या मापांप्रमाणे आहे.

उदा. चार बाजू व एक कोन दिला असता चौकोन काढणे

समजा, ABCD या चौकोनात चारही बाजू व ∠ A दिला आहे. मग ABD या त्रिकोणात AB, AD व ∠ A दिला आहे व Δ ABD काढणे प्रथम शक्य आहे. त्यावरून A, B, D हे बिंदू निश्चित होऊन BD हा कर्णही मिळतो. मग BCD या त्रिकोणाच्या तीनही वाजू माहीत आहेत व B, D हे बिंदूही आहेत. आता कंपासमध्ये BC एवढे अंतर घेऊन, B वर कंपासचे टोक ठेवून मोठा कंस काढा व पुन्हा कंपासमधे CD एवढे अंतर घेऊन D वर टोक ठेवून दुसरा कंस पहिल्या कंसास छेदेल असा काढा. दोन्ही कंसांचा छेदबिंदू हाच c असेल. कारण BC, CD हे दिलेल्या लांबीचे असतील.

घनफळ

क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण क्षेत्रफळाचेच लहानसे, सोयीचे परिमाण, एक चौरस सें.मी. वापरतो तसेच एखाद्या वस्तूचे घनफळ मोजताना एक घन सें.मी. चे परिमाण वापरतो. एक सें.मी. बाजू असलेला धन घेतला, तर त्याचे घनफळ एक घन सें.मी. असते. एखाद्या ठोकळ्याची लांबी a सें.मी., रूंदी b सें.मी. व उंची h

पुरवणी
९७