पान:Ganitachya sopya wata.pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

=1/2पाया x उंची

या ठिकाणी आपण हा नियम भूमितीच्या मदतीने, आकृती काढून व काटकोन चौकोनाच्या क्षेत्रफळाचा नियम वापरून सिद्ध केला आहे. वरील आकृतीमध्ये BC = पाया = 6 सें.मी., AP = उंची = 3 सें.मी. आहे.

∴ Δ ABC चे क्षेत्रफळ = 1/2 6 x 3 चौ. सें.मी.

= 9 चौ. सें.मी. आहे.

 आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्रिकोण कसाही फिरवला, तरी त्याचे क्षेत्रफळ बदलत नाही. म्हणजेच BC ऐवजी AC हा पाया घेतला व B मधून AC वर M लंब रेषा टाकून उंची मोजली,

तरी क्षेत्रफळ = 1/2AC x BM म्हणजे 1/2 BC x AP एवढेच राहील.

1/2 AC x BM = 1/2 BC x AP

आता सगळ्या बाजू सरळ रेषेत असलेल्या बहुभुजाकृतीचे क्षेत्रफळ कसे काढाल बरे? ।

गणिताच्या सोप्या वाटा (Ganitachya Sopya Wata).pdf

उदाहरणासाठी वरील षट्कोन पहा. ABCDEF हा षट्कोन आहे. त्याचे ABC, ACD, ADE व AEF असे भाग पाडले तर या सर्व त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढून त्यांची बेरीज केली, की। षट्कोनाचे क्षेत्रफळ मिळेल होय ना?

९१
पुरवणी