पान:Ganitachya sopya wata.pdf/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भूमिति

 वेगवेगळ्या लांबीचे, पट्टीच्या सहाय्याने रेषाखंड काढणे किंवा कोन मापकाच्या मदतीने पाहिजे तेवढ्या मापाचा कोन काढणे हे तुम्हाला येते ना? किंवा दिलेल्या रेषाखंडाची लांबी देखील पट्टीने मोजता येते. कोन मापकाच्या मदतीने कोन मोजता येतो.

गणिताच्या सोप्या वाटा (Ganitachya Sopya Wata).pdfएखाद्या वस्तूचे वजन आपण कसे मोजतो? मोठ्या वस्तूचे वजन किलोग्रॅम मधे, वेलदोडा, लवंगा यासारख्या लहान वस्तूचे वजन ग्रॅममध्ये असं मोजतो नाही का? आता लांबी मोजण्याचा सेंटिमीटर किंवा मीटर, वजन मोजण्याचा ग्रॅम किंवा किलोग्रॅम, कोन मोजण्याचा अंश ही वेगवेगळी परिमाणं आपल्याला ठाऊक आहेत. पण एकाद्या सपाट भागाचा आकार किंवा क्षेत्रफळ मोजायला. ही परिमाणं चालणार नाहीत. लांबी मोजण्यासाठी सोयीच्या लांबीचेच परिमाण म्हणजे सेंटिमीटर किंवा मीटरची लांबी लागते, वजन मोजण्यासाठी वजनाचेच परिमाण म्हणजे एक किलोग्रॅम किंवा ग्रॅमचे वजन लागते, कोन मोजण्यासाठी लहान, एक अंशाचा कोनच वापरला जातो, तसंच सपाट भागाचे क्षेत्रफळ मोजायला, लहान क्षेत्रफळाचाच तुकडा वापरायचा. आतां सोयीचा,

पुरवणी
८७