पान:Ganitachya sopya wata.pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे(2) 500 रु. वर द.सा.द.शे. 17 रु. ने सरळव्याजाने, 2 वर्षांनी किती व्याज द्यावे लागेल? त्याच मुदलावर द.सा.द.शे. 16 रु. ने 2 वर्षात किती व्याज चक्रवाढव्याजाप्रमाणे होईल?

व्यस्त प्रमाण व मिश्र प्रमाण : आपण व्यस्त प्रमाणाची गणिते सोडवायला शिकलो आहोत. त्याच पद्धतीने सातवीचीही व्यस्त प्रमाणाची गणिते सोडवता येतात. लक्षात ठेवण्याचे सूत्र असे की, अनेकावरून एकाचा विचार करायचा व मग पुन्हा एकावरून अनेकांचा विचार उदाहरणार्थ पुढील गणिते पहा -

उदा.1. 5 मजूर रोज 6 तासांप्रमाणे काम करून 28 दिवसात काम संपवतात तर 7 मजूर रोज 8 तासाप्रमाणे काम करून तेच काम किती दिवसात संपवतील?

5 मजूर रोज 6 तासांप्रमाणे 28 दिवस घेतात तर
∴ 5 मजूर रोज 1 तासाप्रमाणे 28x6 दिवस घेतील
∴ 1 मजूर रोज 1 तासाप्रमाणे 28x6x5 दिवस येईल.
∴ 7 मजूर रोज 1 तासाप्रमाणे 28x6x5/7 दिवस घेतील
∴ 7 मजूर रोज 8 तासाप्रमाणे 28x6x5/7 x 8 दिवस घेतील
28x6x5/7 x 8 = 4x6x5/8 = 15 दिवस लागतील

हे गणित पायरी पायरीने कसे सोडवले आहे पहा आधी मजूर तेवढेच ठेवून रोज 1 तास काम केल्यास किती दिवस लागतील ते शोधले मग 1 मजूर 1 तास काम करत असेल तर लागणारे दिवस काढले इथे अनेकांवरून एकाचा विचार झाला. मग एका ऐवजी जेवढे मजूर लावायचे आहेत त्यांना लागणारे दिवस व मग त्याच मजूरांनी जास्त तास काम केल्यास लागणारे दिवस काढले.

उदा. 2 एक कामगार एका फेरीत 18 विटा नेतो. 22 कामगारांना काही विटा नेण्यास 40 फेऱ्या कराव्या लागल्या. एकूण 24 कामगार

मित्र भागीदारी, चक्रवाढ व्याज, व्यस्त प्रमाण इ.
७७