पान:Ganitachya sopya wata.pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे(2) हिरालालने 7000 रु. भांडवल घालून दुकान उघडले. 4 महिन्यांनी पन्नालालनेही दुकानात 8000 रु. भांडवल घातले. वर्ष अखेरीस 7400 रु. फायदा झाला तो कसा वाटून घ्यावा?

चक्रवाढव्याज : पैसे कर्जाऊ देताना काही वेळा पहिल्या वर्षात मुद्दलाचे जर पैसे आणि त्यावरचे व्याज भरता आले नाही तर दुसया वर्षासाठी व्याज मोजताना पहिल्या वर्षाचे व्याजही कर्जाऊ दिले असे मानून नवे मुद्दल = पहिल्या वर्षाचे मुद्दल + पहिल्या वर्षाचे व्याज असे धरतात. व्याज मोजणीच्या या प्रकारास चक्रवाढव्याज म्हणतात. कारण अशा पद्धतीत दर वर्षी मुद्दलात व व्याजातही वाढ होत राहते. अशा प्रकारची गणितं कशी सोडवतात पहा.

उदा. 1 सुधाकरने 4000 रु. द.सा.द.शे. 10 रु. दराने चक्रवाढव्याजाने कर्जाऊ घेतले. तीन वर्षानंतर त्याने कर्जाची सर्व रक्कम व्याजासह परत केली त्यावेळी त्याला किती रुपये द्यावे लागेल?

व्याजाचा दर 100 रु. ना 10 रु. व्याज असा होता.

∴ पहिल्या वर्षी व व्याज दिले असेल तर गुणोत्तराच्या पद्धतीने

/4000 = 10/100


∴व = 1/10 x 4000 = 400 रु.

दुस-या वर्षी मुद्दल 4000 + 400 = 4400 रु. धरायचे व दुसया वर्षाचे व्याज ज असेल तर

/4400 = 1/10

∴ ज = 4400/१० = 440 रु.

तिसया वर्षासाठी मुद्दल = 4400 + 440 = 4840

मिश्र भागीदारी, चक्रवाढ व्याज, व्यस्त प्रमाण इ.
७५