पान:Ganitachya sopya wata.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नफ्यातून द्यायचे आहेत. पहिल्या महिन्यात 1250 रु. नफा झाला तर तो तिघांनी कसा वाटून घ्यावा?

प्रथम 300 रु. पगार अच्युतला दिला की उरलेला नफा येतो 1250-300 = 950 रु. आता या नफ्याची वाटणी भांडवलाच्या प्रमाणात करायची. अच्युत, केशव व नारायण यांचे भांडवल 25:30:40 किंवा 5:6:8 या प्रमाणात आहे.

∴अच्युतचा नफा = 5p

केशवचा नफा = 6p
नारायणचा नफा = 8p असे मानू.

∴ 5p + 6p + 8p = 19p = 950

P=50 रु.

∴ अच्युतचा नफा = 250 रु.

केशवचा नफा = 300 रु.
नारायणचा नफा = 400 रु.

शिवाय अच्युतचा पगार 300 रु.

∴अच्युत केशव व नारायण यांनी अनुक्रमे (250+300), 300 व 400 रु. घ्यावेत.

सरावासाठी खालील उदाहरणे सोडवा.

(1) राम व शाम यांच्याकडे 8:5 या प्रमाणात रुपये आहेत. रामजवळ शामपेक्षा 84 रु. जास्त असले, तर प्रत्येकाजवळ किती रुपये आहेत?

(2) माया, जया व सोनियां यांनी मिळून खेळण्यांचे दुकान काढले. त्यांचे भांडवल अनुक्रमे 3500, 2000, व 2500 रु. आहे. दुकान . सोनियाच्या घरात असल्यामुळे दरमहा नफ्यांतून तिला 200 रु. द्यायचे आहेत. पहिल्या महिन्यात 2600 रु. नफा झाला तर तो माया, जया व सोनिया यांनी कसा वाटून घ्यावा.

मिश्र भागीदारी, चक्रवाढ व्याज, व्यस्त प्रमाण इ.

विद्यार्थ्यांना हा भाग या पुस्तकातील सर्वात अवघड भाग असा वाटेल.

७२
गणिताच्या सोप्या वाटा