पान:Ganitachya sopya wata.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




मुलग्यांची संख्या 8 ने जास्त आहे तर किती मुलगे व किती मुली आहेत?

मुलगे : मुली = 5:3

∴ मुलग्यांच्या संख्या 5a व मुलींची 3a मानू.

मग मुलग्यांची संख्या ही 2a ने जास्त आहे.

∴ 2a = 8

∴a = 4

∴ मुलग्यांची संख्या 5x4 = 20

व मुलींची संख्या 3x4 = 12 असे उत्तर मिळते.

उदा. 3 एक दुकान उघडताना सोहन, मोहन व रोहन यांनी अनुक्रमे 2000, 3000 व 5000 रु. भांडवल घातले. पहिल्या वर्षी 3200 रु. फायदा झाला तर प्रत्येकाला किती रु. नफा मिळाला?

ज्या प्रमाणात भांडवल, त्या प्रमाणातच नफा किंवा तोटा होणार : आता सोहन, मोहन व रोहन यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2000:3000:5000 म्हणजेच 2:3:5 असे आहे. (तीनही संख्यांना एकाच संख्येने (म्हणजे इथे 1000 ने भागले), तर गुणोत्तर तेच राहते).

∴सोहनचा नफा 2p

मोहनचा नफा 3p
व रोहनचा नफा 5p असे मानूं. मग

2p + 3p + 5p = 10p = 3200

∴p = 320

∴ सोहनचा नफा = 640 रु., मोहनचा नफा = 960 रु., रोहनचा नफा = 1600 रु.

उदा. 4 अच्युत, केशव व नारायण यांनी अनुक्रमे 2500, 3000 व 4000 असे भांडवल घालून वर्तमानपत्रे व मासिके यांचे दुकान उघडले. अच्युतने दुकान चालवले म्हणून त्याला दरमहा 300 रु.

अपूर्णांक व बीजगणित
७१