पान:Ganitachya sopya wata.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मिश्रक्रियांची पदावली : कधी कधी एकाच पदावलीत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कुठल्याही वेगवेगळ्या क्रिया करायच्या असतात. अशा वेळी कुठली आधी व कुठली नंतर करायची याचा गोंधळ होतो. कारणं असं पहा -

4+3x7-2 या पदावलीत बेरीज आधी केली व नंतर गुणाकार व नंतर वजाबाकी केली तर 7x7-2 व 49-2 = 47 असं उत्तर येतं. पण आधी गुणाकार केला तर त्याच पदावलीचं 4+21-2 = 25-2 = 23 असं उत्तर येतं. म्हणजे वेगळ्या क्रिया आधी केल्या तर उत्तर वेगळं येऊ शकतं यासाठी नियम असा आहे की आधी सगळ्या गुणाकार व भागाकार यांच्या क्रिया डाव्या बाजूपासून करायच्या. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे करीत यायचं.

म्हणून 4+3x7-2 = 7x7-2 = 49-2 = 47 हे चूक आहे.

4+3x7-2 = 4+21-2 = 25-2 = 23 हे बरोबर आहे.

आणखी एक उदाहरण पहा - उदा. 8÷7x4+5x2 ही पदावली सोडवा.

आधी 8÷7x4 करू, 8÷7x4 = 8/7 x 4 = 32/7 = 44/7

मग 5x2 = 10 हे सोडवले व पदावलीचे नवे रूप

44/7 + 10 = 144/7 असे उत्तर आहे.

पुनः नियम लक्षात ठेवा : (1) साधारणपणे डावीकडून उजवीकडे गणिती क्रिया करायच्या (2) गुणाकार व भागाकार यांच्या क्रिया आधी करून बेरीज व वजाबाकीच्या क्रिया नंतर करायच्या. सरावासाठी खालील पदावल्या सोडवा.

(1) 5÷2 + 4x3 ÷ 8

(2) 100 - 15 ÷ 5x4 + 8 ÷ 2

(3) 10x2 ÷ 6 + 50 ÷3 -4x2

या पदावल्या सोडवताना गोंधळ होत असल्यास ज्या पदांमध्ये गुणाकार किंवा भागाकार आहे त्या पदांभोवती कंस घालून ते कंस

६८

{[align|right|गणिताच्या सोप्या वाटा}}