पान:Ganitachya sopya wata.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भरायची आहेत. सगळ्या पाकिटांत गोट्यांची एकच संख्या असली पाहिजे. प्रत्येक पाकिटात जास्तीत जास्त किती गोट्या भरता येतील?

(2) मीनाजवळ शेवंतीची काही फुले आहेत. त्यांच्या माळा करायच्या आहेत. 12 फुलांच्या, 16 फुलांच्या किंवा 18 फुलांच्या माळा केल्या तर सगळी फुले संपतील. तिच्याजवळ कमीत कमी किती फुले असतील?

(3) टोपलीतील संत्र्याचे 25, 30 किंवा 40 चे ढीग केले तर प्रत्येक वेळी 5 संत्री उरतात. तर टोपलीत कमीत कमी किती संत्री असतील?

पुन्हा एकदा लक्षात ठेवा की दिलेल्या संख्यांना पूर्ण भाग देणारा मोठ्यात मोठा विभाजक म्हणजेच मसावि व दिलेल्या संख्यांनी विभाज्य, किंवा दिलेल्या संख्यांनी ज्या संख्येला पूर्ण भाग जातो अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावि. मसावि हा कमीत कमी एक व जास्तीत जास्त दिलेल्या संख्यांपैकी सर्वात छोट्या संख्येइतका असतो. लसावि हा कमीत कमी दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येइतका व जास्तीत जास्त दिलेल्या सर्व संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो.

इयत्ता सातवी साठी जादा पुरवणी

लसावि / मसावि

लसावि आणि मसावि म्हणजे काय व संख्यांचे मूळ अवयव पाडून दिलेल्या संख्यांचे लसावि व मसावि कसे काढायचे हे तुम्ही शिकलात. मोठाल्या संख्यांचे अवयव पाडायला त्रास होतो तेव्हा मसावि शोधण्याची आणखी एक रीत सातवीच्या पुस्तकात आहे. ती अशी - 1. दिलेल्या संख्या M व N असतील आणि N ही M पेक्षा मोठी असेल, तर N ला M ने भागा व बाकी किती येते पहा. बाकी जर N1 असेल, M व N चा मसावि हा M N N1 च्या मसावि इतका असतो. दोन संख्यांचा मसावि लिहिण्यासाठी एक पद्धत वापरली जाते. गोल कंसांचा उपयोग त्यात आहे.

६२
गणिताच्या सोप्या वाटा