पान:Ganitachya sopya wata.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
20 = 2x2x5

30 = 2x3x5

25 = 5x5

∴ लसावि = 2x2x3x5x5 = 300

∴शाळेत कमीत कमी 300 मुले असतील.

(300 प्रमाणे 600, 900, 1200 या संख्याही 20, 30, 25 च्या विभाज्य आहेत पण सर्वात छोटी विभाज्य संख्या 300 आहे.)

उदा. 3 एका टोपलीत काही फुले आहेत. त्यातून 20, 15 किंवा 25 फुलांच्या माळा केल्या तर 7 फुले शिल्लक राहतात तर टोपलीत कमीत कमी किती फुले आहेत?

15, 20 किंवा 25. फुलांच्या माळा केल्या तर बरोबर 7 फुले उरतात ती बाजूला काढली तर उरलेल्या फुलांच्या संख्येला 15, 20, 25 यांनी पूर्ण भाग जातो. म्हणून उरलेल्या फुलांची संख्या 15, 20, 25 यांनी विभाज्य आहे व अशी लहानात लहान संख्या म्हणजे त्यांचा लसावि.

15 = 3x5

20 = 2x2x5

25 = 5x5

∴ लसावि = 2x2x3x5x5 = 300

∴ 7 फुले बाजूला काढल्यावर उरलेली फुले कमीत कमी 300 आहेत

∴ एकूण फुले 300+7 = 307 आहेत.

(वरील उदाहरणातही 300 प्रमाणेच 600, 900, 1200 इत्यादी संख्या 15, 20 व 25 ने विभाज्य आहेत पण सर्वात लहान विभाज्य संख्या 300 आहे)

सरावासाठी पुढील गणिते करा -

(1) सुरेशजवळ 432 लाल गोट्या, 612 पांढऱ्या गोट्या व 900 हिरव्या गोट्या आहेत. त्याला प्रत्येक रंगाच्या गोट्यांची पाकिटे

ल.सा.वि. / म.सा.वि.
61