पान:Ganitachya sopya wata.pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
∴ लसावि साठी 2 हा तीन वेळा, 3 हा एक वेळा व 5 एक वेळा घेऊन लसावि = 2x2x2x3x5 = 120 येतो.

प्रत्येक संख्येत 2 हा कमीत कमी दोनदा व 3 एकदा येतो.

∴ मसावि = 2x2x3 = 12 येतो.

आणखी एक उदाहरण पहा.

उदा. 36 व 54 यांचे लसावि - मसावि काढा.

36 = 2x2x3x3

54 = 2x3x383

∴लसावि = 2x2x3x3x3 = 108

मसावि = 2x3x3 = 18

कुठल्याही संख्येचे मूळ अवयव पाडताना 2, 3, 5, 7, 11 यापैकी कुठल्या मूळ संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो ते पहावे लागते. त्यासाठी सोपे व उपयोगी पडणारे नियम पाठ करा व नीट ध्यानात ठेवा. -

1) एखाद्या संख्येच्या एकक स्थानच्या आकड्याला 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 50, 42, 64, 18 यांना 2 ने भाग जातो पण 17, 45, 93 यांना 2 ने भाग जात नाही.

2) एखाद्या संख्येतील सर्व आकड्यांची बेरीज करून मिळणाच्या संख्येला 3 ने भाग जात असेल, तर मूळ संख्येलाही 3 ने भाग जातो.

उदा. 315 या संख्येमध्ये, उ+1+5 = 9 व 3 ने 9 ला भाग जातो म्हणून उ15 ला 3 ने भाग जातो पण
421 मध्ये, 4+2+1 = 7 व 3 ने 7 ला भाग जात नाही म्हणून 421 ला 3 ने भाग जात नाही.

3)एखाद्या संख्येत, एकक स्थानी o किंवा 5 हा आकडा असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो.

जसे - 315 मध्ये एकक स्थानी 5 आहे म्हणून 315 ला 5 ने भाग जातो.

५८
गणिताच्या सोप्या वाटा