पान:Ganitachya sopya wata.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साध्याअपूर्णांकांचा भागाकार कसा करतात आठवते ना ? लक्षात ठेवा की एकाद्या संख्येला व्यवहारी अपूर्णांकाने भागणे म्हणजे तो अपूर्णांक उलटा करून गुणणे होय.

उदाहरणार्थ 48 ÷ 3/4 = 48 x 4/3= 64

किंवा 56/9 ÷ 6/5 = 56/9 x 5/6 = 140/27

आता दशांश अपूर्णांकांच्या भागाकाराचा नियम बरोबर कसा आहे पहा हं !

23.8 ÷ .14 = 238/10 ÷ 14/100
= 238/10 x 100/14 = 2380/14
= 2380 ÷ 14

आणि दशांश टिंब सरकवण्याच्या नियमाने देखील हाच भागाकार आला ना ?

सरावासाठी पुढील भागाकार करा.

81.92 ÷ 1.6, 3.375 ÷ 4.5, 129. ÷ 1.2.

ल. सा. वि. / म. सा. वि.

अनेकदा लसावि मसावि नावाचे राक्षस विद्यार्थ्यांचा गोंधळ करतात - हे शब्द छोटे असूनही भयंकर वाटू लागतात. ते काय आहेत हे एकदा नीट समजलं व लक्षात ठेवलं की हेच राक्षस आपल्याला वश होऊ शकतात. यासाठी आधी त्यांचा अर्थ पहा.

ल. सा. वि. = लघुत्तम साधारण विभाज्य

म. सा. वि. = महत्तम साधारण विभाजक

म्हणजे लसावि/मसावि मधला 'सा' एकच असला तरी ‘वि' मात्र

५४
गणिताच्या सोप्या वाटा