पान:Ganitachya sopya wata.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उदा. (3) .12 * 1.63

इथे 12 x 163 हा गुणाकार प्रथम करू. तोच 163 x 12 असा करणं अधिक सोपं आहे.

163     आता .12 मधे दशांश टिंबानंतर 2 आक़डे
x 12    व 1.63 मधेही दोन आकडे टिंबानंतर आहेत.
--------
1956

∴ गुणाकारात टिंबाच्या उजव्या बाजूला 2 + 2 = 4 आकडे आले पाहिजेत ∴ .12 x 1.63 = .1956.

उदा. (4) .08 x 1.2

इथे पूर्णांक संख्या केल्यावर 08 म्हणजेच 8 व 12 या दोन पूर्ण संख्या मिळतात. 8 x 12 = 96 आहे. आता .08 मधे दशांश टिंबानंतर 2, 1.2 मधे टिंबानंतर 1 आकडा आहे म्हणून गुणाकारात दशांश टिंबाच्या उजव्या बाजूला 2 + 1 = 3 आकडे हवेत. 96 या पूर्ण संख्येत दोनच आकडे आहेत पण लक्षात ठेवा की पूर्ण संख्येच्या डाव्या बाजूला कितीही शून्ये लिहिता येतात म्हणून 96 = 096 असे लिहून गुणाकार येतो .08 x 1.2 = .096.

सरावासाठी खालील गुणाकार करा. 4.6 x 1.4, 5.2 x 1.15, .8 × 3.72, .16 x 2.5, 03 x 2.9, 18.6 x .13.

आता दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा ते पाहू. उदाहरणार्थ 38.16 ÷ 1.2 हा भागाकार करू या.

भागाकार करताना भाजक हा पूर्णाक करून घेतला की सोपे होते पण भाजक अपूर्णांक असून त्याचा पूर्णांक करायचा म्हणजे 10, 100 किंवा तसल्याच संख्येने गुणायचे मग आपला भागाकार चुकणार नाही का ? 1.2 ऐवजी 12 ने भागले, तर भागाकार कमी येईल पण मग भागाकार चुकू नये म्हणून भाजकाला ज्या संख्येने गुणायचं त्याच

५२
गणिताच्या सोप्या वाटा