पान:Ganitachya sopya wata.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थोडक्यात एकावर शून्ये असलेल्या संख्येने दशांश अपूर्णाकाला भागताना, एकावर जेवढी शून्ये असतील, तेवढी स्थाने दशांश टिंब डावीकडे न्यावे लागते. पुन्हा काही असेच भागाकार पहा

12.6/10 = 1.26, 12.6/100 = .126 आणि 12.6/1000 = .0126

या शेवटच्या भागाकारात दशांश टिंब तीन स्थाने डावीकडे न्यायचे आहे. पण टिंबाआधी दोनच आकडे आहेत. आता हे ध्यानात घ्या की 12.6 = 012.6 = 0012.6. म्हणून दशांश टिंब तीन स्थाने डावीकडे नेताना डावीकडच्या शून्याचा उपयोग होतो व दशांश टिंब कितीही स्थाने डावीकडे नेता येते.

आता सरावासाठी पुढील भागाकार करा.

72.4/10 , 415/100, 803.21/100 , 48/1000 , .37/10

आता एकावर शून्ये असलेल्या संख्येने गुणाकार देखील कसा सोपा असतो याची उजळणी करू.

3.6 x 10 = 36/10 x 10 = 36

4.72 x 10 = 472/100 x 10 = 472/10 = 47.2

36.12 X 100 = 3612/100 x 100 = 3612

.024 x 10 = 24/1000 x 10 = 24/1000= .24

4.98 x 1000 = 498/100 x 1000 = 498 x 10 = 4980.

आता लक्षात आलं ना की एकावर शून्ये असलेल्या संख्येने दशांश अपूर्णाकाला गुणताना, एकावर जेवढी शून्ये त्या संख्येत आहेत तेवढी स्थाने दशांश टिंब उजवीकडे सरकवायचे. आता वरील शेवटच्या गुणाकारात 4.98 ला 1000 ने गुणायचे आहे म्हणजे दशांश टिंब तीन स्थाने उजवीकडे न्यायचे पण दशांश टिंबाच्या उजवीकडे दोनच आकडे आहेत. तरी हे लक्षात घ्या की 4.98 = 4.980 = 4.9800

दशांश अपूर्णांक
४९