पान:Ganitachya sopya wata.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कारण 3 हा पूर्णांक आहे व त्या पूर्णांकाच्या आधी कितीही शून्ये दिली तरी संख्या बदलत नाही.

दशांश अपूर्णांकाच्या बेरजा वजाबाक्या अगदी सोप्या असतात. साध्या व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना दोन्ही अपूर्णांकांना समान छेद देऊन मग बेरीज किंवा वजाबाकी केली जाते. जसे

1/3 + 1/5 = 5/15 + 3/15 = 5 + 3/15 = 8/15

किंवा 2/3 - 1/4 = 8/12 - 3/12 = 8 - 3/12 = 5/12

पण दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी सोपी असते.

जसे  3.25   8.12

 + 14.08   - 6.75

 -------   ---------

  17.33    1.37

म्हणजे दशांश अपूर्णांक एका खाली एक असे लिहा की वरच्या अपूर्णांकाच्या दशांश टिंबाच्या बरोबर खाली, खालच्या दशांश अपूर्णांकाचे टिंब येईल. मग टिंबाकडे लक्ष न देता नेहमीप्रमाणे बेरीज किंवा वजाबाकी करा व उत्तरातही टिंब वरच्या टिंबांच्या खाली लिहा. पण इथे एक काळजी घ्या - दोन्ही संख्यांमधे दशांश टिंबानंतर आकड्यांची संख्या सारखीच ठेवा म्हणजे चूक होणार नाही. जसे - 3.4 + 12.62 करताना

3.4 मधे दशांश टिंबानंतर एकच आकडा आहे म्हणून 3.4 ऐवजी 3.40 लिहू म्हणजे दोन्ही संख्यांमधे दशांश टिंबांनंतर दोन दोन आकडे होतील. मग

3.40
+ 12.52
--------
16.02    अशी बेरीज करता येईल.

तसेच 9.2 - 5.48 करताना  (9.2 = 9.20)

४६
गणिताच्या सोप्या वाटा