पान:Ganitachya sopya wata.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ∴ य = 160 x 15/60 = 8 x 5 = 40

∴ 60 दिवसात काम करण्यास 40 मजूर लावावे लागतील.

सरावासाठी खालील उदाहरणे सोडवा.

(1) आठ घोड्यांना काही हरभरे 112 दिवस पुरतात तर सात घोड्यांना ते किती दिवस पुरतील ?

(2) लीला एका तासात 15 गजरे करते तर गौरी एका तासात 20 गजरे करते. जे गजरे करायला लीलाला चार तास लागले, ते गौरी किती वेळात करेल ?

(3) एक मोटर ताशी 30 कि.मी. वेगाने गेली, तर पुणे सातारा अंतर 4 तासात जाते. मोटारीचा वेग दीडपट केला तर तेच अंतर किती वेळात जाईल ?

दशांश अपूर्णांक

अपूर्णांक जर दशांश पद्धतीने लिहिले तर बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार या क्रिया करणं बरंच सोपं जातं. म्हणून ही पद्धत जरूर शिका. कुठलाही दशांश अपूर्णांक, साध्या व्यवहारी अपूर्णाकासारखा लिहिणे सोपं असतं. आता 32.7 हा दशांश अपूर्णांक पहा. दशांश टिंबाच्या आधीची म्हणजे डाव्या बाजूची संख्या 32 ही पूर्णांक आहे व टिंबाच्या पुढचा भाग हा एकापेक्षा कमी अशी अपूर्णांकाचा आहे. .7 = 7/10 म्हणून 32.7 = 32 7/10. टिंबानंतर जेवढे आकडे

४४
गणिताच्या सोप्या वाटा