पान:Ganitachya sopya wata.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
∴हे गुणोत्तर कायम आहे. 272 कि.मी. जाण्यास क्ष मिनिटे लागतात असे मानू.


60/34 = क्ष/272

∴ क्ष = 60/34 x 272 = 480

∴ 272 कि.मी. जाण्यास 480 मिनिटे किंवा 480/60 = 8 तास लागतील.

कधी कधी एकाच उदाहरणाचे वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या पद्धतीने सोडवावे लागतात याचा आणखी एक नमुना पहा.

उदा० एक भिंत बांधायला 15 मजूरांना 40 दिवस लागतात तर चार भिती 60 दिवसात पुऱ्या करायला किती मजूर लागतील ?

इथे करायचे काम हे चार भिंती बांधायचे आहे. त्यासाठी एका मजूराला। किती दिवस लागतील हे आधी काढू.

15 मजूरांना 1 भिंत बांधायला 40 दिवस तर 15 मजूरांना 4 भिती बांधायला 40 X 4 = 160 दिवस

आता 15 मजूरांना 160 दिवस लागतात तर 1 मजूराला 160 x 15 दिवस लागतील.

आपली रीत वापरून 1 मजूराला लागणारे दिवस/एकूण मजूर = एकूण मजूरांना लागणारे दिवस

∴ एकूण मजूर य लागतात असे मानले तर

160 x 15/ = 60

∴ 60य = 160 x 15व्यस्त प्रमाणाची गणिते (काळ काम वेग)
४३