पान:Ganitachya sopya wata.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेप्रथम 12 मजुरांना एका घरास 48 दिवस लागतात तर ठरलेलं काम म्हणजे 2 घरे बांधण्यास तेवढ्या मजुरांना 48 x 2 = 96 दिवस लागतील.
आता एका मजुराला ठरलेलं काम करायला किती दिवस लागतील ते काढू.
12 मजुरांना 96 दिवस लागतात.
∴ 1 मजुराला 96 x 12 दिवस लागतील.
कारण एक मजूर 12 मजुरांचं एका दिवसाचे काम करायला 12 दिवस घेईल इथे 96 x 12 हा गुणाकार करून उत्तर काढले नाही तरी चालेल कारण अजून 96 x 12 या संख्येला भागायचं आहे. आता 'म' मजूर लावल्यास ठरलेलं काम 32 दिवसात होत असेल, तर आपल्या नियमाप्रमाणे
96 X 12/ = 32 हे समीकरण मिळते.
∴ 32म = 96 x 12   (दोन्ही बाजूंची अदलाबदल व दोन्ही बाजूंना म ने गुणले)
∴ म = 96 x 12/32 = 36   ((इथे अंश व छेद यांना प्रथम 8 ने व मग 4ने भागले)
∴36 मजूर लावले तर 2 घरे 32 दिवसांत बांधतील. इथे 96 x 12 = 1152 हा गुणाकार करण्याचा वेळ वाचला व 1152/32 हा भागाकारही सोपा झाला हे ध्यानात घ्या.

उदा. रोज 4 गणिते केल्यास एक, गणितांचा संग्रह 12 दिवसात सोडवला जातो. रोज 6 गणिते केल्यास किती दिवसांत संपेल ?

रोज जास्त गणिते केली तर संग्रह सोडवण्यास कमी दिवस लागतातव्यस्त प्रमाणाची गणिते (काळ काम वेग)
४१