पान:Ganitachya sopya wata.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



∴ 125द = 1250
∴ द = 10
∴. व्याजाचा दर द. सा. द. शे. 10 रु. आहे.

सरळव्याजाची गणिते करताना हे लक्षात ठेवा.

(1) जी संख्या शोधायची तिच्यासाठी अक्षर माना

(2) दिलेल्या मुदतीचे व्याज/मुद्दल , दिलेल्या मुदतीची रास/मुद्दल , मुदत/ व्याज इत्यादि गुणोत्तरांपैकी कुठले गुणोत्तर मांडता येते पहा

(3) 100 रु. मुद्दल घेऊन तेच गुणोत्तर दुस-या प्रकाराने मांडा व समीकरण लिहा.

(4) समीकरणाच्या बाजू दोन भांडखोर जुळ्या भावांसारख्या आहेत हे लक्षात ठेवून दोन्हींवर सारख्याच गणिती क्रिया करा, आवश्यक वाटल्यास बाजूंची अदलाबदल करा व अक्षराची किंमत काढा. आतां सरावांसाठी पुढील उदाहरणे सोडवा.

(1) द. सा. द. शे. 10 दराने 700 रु. ची दामदुप्पट किती वर्षांनी होईल?

(2) द. सा. द. शे. 8 दराने 450 रु. ची. 7 वर्षांची रास किती होईल ?

(3) द. सा. द. शे. 9 दराने हेमाने कर्ज काढले आठ वर्षांनी तिला एकूण 1290 रु. द्यावे लागले तर हेमाने किती वर्ष काढले होते ?

(4) 6400 रु. चे. 7 वर्षाचे व्याज 5376 रु. होते. तर व्याजाचा दर काय असेल?

व्यस्त प्रमाणाची गणिते (काळ काम वेग)

आता पर्यंत ज्या संख्या समप्रमाणात बदलतात, त्यांची गणिते कशी

३८
गणिताच्या सोप्या वाटा