पान:Ganitachya sopya wata.pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्याज मिळण्यासाठी किती वर्षे कर्जे द्यावे लागेल ?

इथे 3600 रु. मुद्दलाचे 1440 रु. व्याज येण्यास व वर्षे लागतील असे समजू. मग 100 रु. वर व वर्षात किती व्याज येते ते काढू. 100 रु. स. 1 वर्षात 10 रु. व्याज.

∴ 100 रु. स. व वर्षात 10 x व = 10 व रु. व्याज

आता व वर्षात व्याज/मुद्दल हे गुणोत्तर दोन प्रकारांनी लिहिता येईल

1440/3600 = 10 व/100 (बाजूंची अदलाबदल करून दोन्ही बाजूंना 3600 ने गुणू )
∴ 360 व = 1440
∴ व = 4
∴ 4वर्षे कर्ज द्यावे लागेल.

उदा. 4 2500 रु. कर्ज रखमाबाईंनी सरळव्याजाने काढले. 5 वर्षांनी पैसे परत करताना त्यांना एकूण 3750 रु. परत करावे लागले. तर व्याजाचा दर काय होता ?

एकूण परत केलेली रक्कम = मुद्दल + व्याज = रास
व्याजाचा दर द. सा. द. शे. द रु. आहे असे मानूं.
∴ 5 वर्षात 100 रु. वर 5 द रु. व्याज होईल.
2500 रु. वर 5 वर्षात 3750 - 2500 = 1250 रु. एवढे व्याज दिले.

5 वषाचे व्याज/मुद्दल हे गुणोत्तर दोन प्रकारांनी लिहून

5 द/100 = 1250/2500   असे समीकरण मिळते.
∴ 5 द x 25 = 1250  (दोन्ही बाजूंना 2500 ने गुणले)

सरळव्याज
३७