पान:Ganitachya sopya wata.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



हे गुणोत्तर प्रमाण पाहू. ते आहे 100/94 तसेच मोहनची खरेदी ख रु. असेल तर तेच गुणोत्तर /329 आहे.

/329 = 100/94
∴ख = 100/94 x 329
∴ख = 50/47 x 329  (अंश व छेद दोघांना 2 ने भागले)
∴ख = 50 x 7 = 350 रु.
∴खरेदीची किंमत 350 रु. आहे.
पुढील उदाहरण किंचित् मोठे आहे पण थोडा विचार केला तर अवघड नाही.

उदा. 3 - चंद्रकांतने नागपूरहून 30 रु. ना एक याप्रमाणे संत्र्यांच्या 15 करंड्या मागवल्या. त्यांच्यासाठी रेल्वे भाडे 75 रु. द्यावे लागले. नंतर त्याने त्या करंड्या 42 रु. ना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला किती टक्के नफा झाला ?

इथे खरेदीची किंमत काढताना, मूळ किंमतीत रेल्वे भाडे देखील मिळवले पाहिजे. कारण खरेदीची एकूण किंमत म्हणजे त्या वस्तूसाठी चंद्रकांतने एकूण जेवढा खर्च केला तो. 15 करंड्यांची मूळ किंमत 30 x 15 = 450 रु. व आणण्याचा खर्च 75 रु.

एकूण खरेदीची किंमत = 450 + 75 = 525 रु. झाली.
विक्रीची किंमत 42 x 15 = 630 रु. झाली.
∴नफा = विक्री - खरेदी
= 630 - 525 = 105 रू.
आता चंद्रकांतला नफा 105 रु. झाला. व तो 525 रु. खरेदीवर झाला.

३२
गणिताच्या सोप्या वाटा