पान:Ganitachya sopya wata.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



∴रमेशला शेकडा 56 किंवा 56% मार्क आहेत.

∴रमेशला (56 - 52 = 4) 4% मार्क जास्त आहेत.

शेकडेवारीचं किंचित वेगळ्या भाषेतलं गणित पहा -

उदा. घराच्या भाड्याच्या 22% घरपट्टी हा कर द्यावा लागतो. गणोजी दर वर्षी 3300 रु. घरपट्टी देतात तर त्यांना एका वर्षात घरभाडे किती मिळते ?

घरपट्टी ही भाड्याच्या 22% याचा अर्थ 100 रु. घरभाडे असेल तर 22रु. घरपट्टी द्यावी लागते. घरभाडे जास्त असेल तर घरपट्टी त्या प्रमाणात जास्त होणार म्हणजे दोन्ही समप्रमाणात आहेत व घरपट्टी/घरभाडे हे गुणोत्तर प्रमाण कायम आहे. ते 22/100असे आहे कारण 100 रु. घरभाडे असेल तर घरपट्टी 22 रु. असते. गणोजी दरवर्षी व रु. घरभाडे घेतात मानले तर हेच गुणोत्तर 3300/ असे येते.

3300/ = 22/100

3300/ x 100 व = 22/100 x 100 व ( दोन्ही बाजूंना 100 व ने गुणले)

∴ 330000 = 22व
∴ व = 15000 (बाजूंची अदलाबदल करून दोन्ही बाजूंना 22 ने भागले)
∴गणोजींना दर वर्षी 15000 रु. घरभाडे मिळते.

आतां हे किंचित् मोठे गणित पहा.

उदा. एका गुदामात 150000 धान्याची पोती आहेत. त्यात उ5% ज्वारीची, 30% गव्हाची व बाकीची इतर धान्याची आहेत. तर त्या गुदामात इतर धान्याची किती पोती आहेत?

२६
गणिताच्या सोप्या वाटा