पान:Ganitachya sopya wata.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ही संख्या तुलनेसाठी घेतली की सोपं जातं म्हणून 100 या संख्येबरोवर तुलना केली जाते. शेकडा म्हणजे 100, अशा शेकड्याच्या तुलनेने सोडवायची गणिते म्हणजे शेकडेवारीचे गणिते ही तुलना कशी मदत करते पहा.

उदा. सुरेशला मराठीमध्ये 75 पैकी 39 मार्क मिळाले. रमेशच्या वर्गातला मराठीचा पेपर 50 मार्काचा होता व त्याला 50 पैकी 28 मार्क मिळाले. कुणाला जास्त मार्क आहेत?

इथे सुरेशला 39 म्हणजे रमेशपेक्षा जास्त मार्क असले तरी सुरेशचे 75 पैकी व रमेशचे 50 पैकी आहेत. म्हणून तुलना सोपी नाही. दोघांचेही पेपर 100 मार्काचे आहेत मानून प्रत्येकाला 100 पैकी किती मार्क आहेत ते काढू मग तुलना सोपी होईल.

सुरेशला एकूण 75 मार्कापैकी 39 मार्क आहेत म्हणून त्याचे मिळालेले मार्क/एकूण मार्क हे गुणोत्तर 39/75 = 13/25 असे आहे.

एकूण मार्क त्याला 100 पैकी स मार्क मिळतील असे मानले तर

/100 = 13/25
∴ स = 13/25 x 100 = 52

∴सुरेशला 100 पैकी 52 म्हणजेच शेकडा 52 मार्क आहेत हीच गोष्ट सुरेशला 52 टक्के किंवा 52% मार्क आहेत अशीही लिहितात. टक्के म्हणजे 100 पैकी !

आता रमेशचे मार्क/एकूण मार्क हे गुणोत्तर 28/50 = 14/25 आहे.

रमेशला 100 पैकी ‘र’ मार्क असले तर

/100 = 14/25
∴ स = 14/25 x 100 = 56

शेकडेवारी
२५