पान:Ganitachya sopya wata.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येईल ∴ 4म = 16 + 4    (दोन्ही बाजूंमध्ये 4 मिळवून

∴5म = 20     हेच समीकरण मिळते)
∴ म = 4

समीकरणाच्या एका बाजूला असलेलं पद नष्ट करायचे असेल तर दोन्ही बाजूंना त्याच्या विरूद्ध चिन्हाचं तेवढंच पद जोडायचं. जसे इथे - 4 हे डाव्या बाजूचे पद 4 मिळवल्यावर नष्ट झाले पण उजव्या बाजूमध्ये 4 ची भर पडली. म्हणून असंही म्हणता येईल की 5म - 4 = 16 यातील - 4 हे डाव्या बाजूचे पद उजव्या बाजूला आणून 5म = 16 + 4 हे समीकरण मिळालं. म्हणजे डाव्या बाजूचे पद चिन्ह बदलून उजव्या बाजूकडे झालं. पुन्हा लक्षात घ्या की एका बाजूचे पद समीकरणाच्या दुस-या बाजूला नेताना त्याचे चिन्ह बदलावे लागते तरच ते समीकरण बरोबर राहते.

अशा समीकरणांची उत्तरं बरोबर आहेत की नाही याची तपासणी किंवा ताळा करणे सोपे असते व ते जरूर करा.

जसे --- म = 4 असेल तर मूळ समीकरण 5 x 4 - 4 = 16 असं होतं व यात दोन्ही बाजूंची किंमत 16 असल्यामुळे ते बरोबर आहे म्हणून म = 4 हे उत्तर बरोबर असले पाहिजे.

तेव्हा समीकरण सोडवून अक्षराची जी किंमत येते ती वापरून मूळ समीकरणाच्या दोन्ही बाजूंची किंमत सारखी आहे ना हेच तपासून पहायचं असतं.

आणखी एक समीकरण सोडवू या.

उदा० खालील समीकरणावरून 'अ' ची किंमत काढा -

6अ - 13 = 15 + 4अ.

आता सगळी अ ची पदे डाव्या बाजूला व संख्या उजव्या बाजूला नेऊ.

∴ 6अ - 4अ = 15 + 13    (+4अ डावीकडे



समीकरण
१७