पान:Ganitachya sopya wata.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे समीकरण पहा :

42 - 6 = 5 x 2.

यात डाव्या बाजूची किंमत 42 - 6 = 16 - 6 = 10

तसंच उजव्या बाजूची किंमत 5 x 2 = 10

म्हणजे डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंची किंमत सारखीच आहे व हे समीकरण बरोबर आहे. आता डाव्या बाजूमध्ये 5 ही संख्या मिळवली, तर उजव्या बाजूचा जुळा भाऊ भांडेल व उजव्या बाजूलाही 5 ही संख्या मिळवावी लागेल. मग ते समीकरण असं होईल

42 - 6 + 5 = 5 x 2 + 5

पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या की समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर सारखीच गणिती क्रिया केली, तरच नव्याने मिळालेलं समीकरण बरोबर असतं. या नियमाचा उपयोग करून, छोटी छोटी, अक्षरांची समीकरणं सोडवायला शिका.

उदा० 5म - 4 = 16, तर म ची किंमत काय ?

ज्या अक्षराची किंमत काढायची, त्या अक्षराची पदं डाव्या बाजूला ठेवून इतर पदं दुसया बाजूला न्यायची किंवा त्यात इतर पदांच्या विरूद्ध चिन्हांची पदं दोन्ही बाजूंमध्ये मिळवायची.

जसे 5म - 4 = 16 यात डाव्या बाजूला 4 मिळवले की फक्त म चे पद राहील पण मग उजव्या बाजूलाही 4 मिळवायला हवेत

∴ 5म - 4 + 4 = 16 + 4
∴ 5म = 20
∴ म = 4 (दोनही बाजूंना 5 ने भागले).

दुस-या प्रकारानेही हे लक्षात ठेवता येईल. समजा डाव्या बाजूला फक्त ‘म’ चे पद ठेवायचे आहे. मग 5म - 4 = 16 यातील - 4 हे पद उजव्या बाजूला नेताना त्याचे चिन्ह बदलून + 4 हे उजव्या बाजूला

१६
गणिताच्या सोप्या वाटा