पान:Ganitachya sopya wata.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बेरीज करताना, लहान पदाएवढंच पद मोठ्या पदातून वेगळे काढले तर विरुद्ध चिन्हांच्या समान पदांची बेरीज शून्य येते. मग मोठ्या पदातून लहान पद काढल्यावर जे उरतं, तेच उत्तर येतं.

अक्षरांच्या बेरजा वजाबाक्या करताना हे लक्षात ठेवा की फक्त सजातीय पदांचीच बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे 6ब - 2ब = 4ब, पण 6अ - 2ब म्हणजे 6अ - 2ब असेच लिहावे लागतात. इथे 6अ मधून खरोखर 2ब वजा करता येत नाहीत कारण अ आणि ब हे काय आहेत हे आपल्याला ठाऊक नाही. कुठल्यातरी संख्या आहेत. किंवा वस्तू आहेत एवढंच माहीत आहे. विविध अक्षरांची व संख्यांची बेरीज वजाबाकी होऊन पदावली बनते.

(15म - 4न + 10क्ष), (6अ' + 4अब - 7ब), (25क्ष - 36) या सगळ्या पदावल्या आहेत. यांच्या बेरजा वजाबाक्या करताना सजातीय पदांच्या बेरजा वजाबाक्या करायच्या असतात.

उदा० 1. (15म - 4न + 10क्ष) व (4म + 2न) या पदावल्यांची बेरीज अशी करता येते

15म - 4न + 10क्ष
+ 4म + 2न
--------------------
19म - 2न + 10क्ष

.. (15म - 4न + 10क्ष) + (4म + 2न)
= 19म - 2न + 10क्ष.

एका पदावलीतून दुसरी पदावली वजा करायची असेल तर आतां हे लक्षात ठेवा की एकादं पद वजा करणं म्हणजे त्याचे चिन्ह बदलून बेरीज करणं होय. जसे 5न मधून 2न वजा करणं म्हणजे
5न + (- 2न) = 5न - 2न = 3न
किंवा 6म मधून (- 3म) वजा करणे म्हणजे 6म - (- 3म)

= 6म + 3म = 9म.


अक्षरांचे गणित किंवा बीजगणित
१३