पान:Ganitachya sopya wata.pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


5 = प चा पाचवा घात = प x प x प x प x प (पाच वेळा प)

124 = 12 चा चौथा घात = 12 x 12 x 12 x 12. (चार वेळा 12)

अक्षरांच्या संख्यांची बेरीज वजाबाकी देखील सोपी असते.

4म + 3म = 7म

10क्ष + 2क्ष + 9क्ष = 21क्ष

15क्ष - 7क्ष = 8क्ष

20ग - 4ग = 16ग

हे समजलं ना ? आता 4न - 10न हे कसे करायचे पहा. 10न हे 4न पेक्षा मोठे आहेत म्हणून 4न मधून 10न वजा करण्याची रीत अशी : 10न मोठे म्हणून, 10न व 4न यांची चिन्हे उलटी करायची व मोठ्या संख्येचे चिन्ह आलेल्या उत्तराला द्यायचं. हे असं का केलं पहा. आता न ही एक लांबी आहे असे समजा. 4न म्हणजे उजवीकडे 4 वेळा न ही लांबी चालून गेलो व मग - 10न म्हणजे विरूद्ध दिशेला किंवा डाव्या बाजूला 10न लांबी चालून गेलो तर आपण पहिल्या जागेपासून कुठे असू ? पहिली जागा म्हणजे शून्य अंतरावरची जागा म्हणायची.

गणिताच्या सोप्या वाटा (Ganitachya Sopya Wata).pdfआकृतीत पहा - 0 पासून 4न उजवीकडे व मग 10 न डावीकडे चालून गेलं की एकूण 6न डावीकडे म्हणजे - 6न अंतर चालून गेल्याप्रमाणे उत्तर येतं की नाही ?

इथे आणखी नीट समजायला हवे असेल तर

4न - 10न = 4न - 4न - 6न = 0 - 6न = - 6न

हे लक्षात घ्या. म्हणजे दोन विरूद्ध चिन्हांच्या एकाच प्रकारच्या पदांची

१२
गणिताच्या वाटा