पान:Ganitachya sopya wata.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अक्षरांच्या भाषेत अपूर्णांक अ/छ लिहिला, तर एखाद्या वस्तूचा अ/छ भाग म्हणजे छ ने त्या वस्तूला भागायचं आणि अ ने गुणायचं.

अपूर्णांकामध्ये तुलना कशी करायची हे माहीत आहे का ? कुठलेही पूर्ण आकडे दिले असले, जसे 70, 58, 94, 32, तर त्यातला सर्वात मोठा कुठला, लहान कुठला हे तुम्हाला समजतं. पण अपूर्णांकामध्ये लहान मोठा ओळखणं जरा कठीण आहे. कारण अपूर्णांक हे वेगवेगळ्या उंचीवर उभे असलेलया लोकांप्रमाणे असतात.

या चित्रांत कुठला माणूस उंच वाटतो ? अ की ब ? ही दोन्ही माणसे वेगवेगळ्या उंचीच्या ठोकळ्यांवर उभी असल्यामुळे लहान मोठा ठरवणं कठीण आहे. ती जर एकाच उंचीच्या ठोकळ्यावर उभी राहिली, अशी -

तर लगेच ओळखता येतं की अ हा ब पेक्षा उंच आहे. अपूर्णांकांचे असंच आहे. त्यांचा पायाचा ठोकळा म्हणजे छेद सारखा असेल, तर त्यांची तुलना करून लहान मोठा ठरवता येतं.

आता छेद सारखा कसा करायचा ? त्यासाठी हे लक्षात असू द्या की कुठल्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच अंकाने गुणलं तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. जसे २/3 = 4/6 = २ x 2 /4 x 6


१०
गणिताच्या सोप्या वाटा