पान:Ganitachya sopya wata.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सें.मी. असेल तर त्यात a x b x h एवढे एक सें.मी. चे ठोकळे मावतील म्हणून त्या ठोकळ्यांचे घनफळ हे a x b x h धन सें.मी. होईल.

आकृतीतील ठोकळ्याची लांबी 4 सें.मी., रूंदी 2 सें.मी. व उंची 3 सें.मी. आहे. तिचे घनफळ 4 x 2 x 3 = 24 घन सें.मी. आहे. ठोकळ्याच्या घनफळाकडे आणखी एका प्रकाराने पहाता येईल. त्याचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ x उंची असेही आहे.

एखाद्या चितीचे घनफळ याच नियमाने काढतात. चिती म्हणजे सपाट पृष्ठभागावर उभी राहू शकेल अशी, तळापासून वरच्या पृष्ठभागापर्यंत एकाच आकाराचा छेद असणारी आकृती.

 वरील सर्व आकृत्या वेगवेगळ्या चितीच आहेत.

घनाकृति ठोकळे व चिती यांची घनफळे काढायला सोपी असतात तशी इतर घनाकृतींची नसतात.

अकरावी बारावीच्या वर्गात तुम्ही गणिताचा अभ्यास केलात, तर Calculus किंवा कलनशास्त्राच्या मदतीने आणखी काही घनाकृतींचे घनफळ व अनेक सपाट आकृतींचे क्षेत्रफळ तुम्ही काढू शकाल.


------------------
९८
गणिताच्या सोप्या वाटा