पान:Gangajal cropped.pdf/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.बारा :
किंकाळी


 चित्राचं नाव काय असावं, नक्की आठवत नाही. बहुधा 'द क्राय! 'किंकाळी' - असावंसं वाटतं. चित्रकाराचंही नाव आठवत नाही. आठवतं ते फक्त चित्र आणि दरवेळी आठवलं म्हणजे भीतीनं अंग शहारतं. चित्र अगदी साधं- फक्त काळपांढरं. एक बाई, तीही अगदी साधी. अतिरेखीव नाही, विकृत तर नाहीच नाही. तिनं किंकाळी मारताना तोंड उघडलं आहे, एवढंच चित्र. पण पहिल्या क्षणापासून आतापर्यंत चित्र डोळ्यांपुढं आलं की, ती किंकाळी ऐकू येते. तो एकाकी असहायपणा, सगळं संपलं, अशी अगतिक जाणीव चित्र पाहताना जी झाली, ती आजही होत आहे.

 आणखी एक किंकाळी सारखी आठवते,- मनात घर करून राहिली आहे- ती म्हणजे काम्यूच्या 'फॉल' नावाच्या कादंबरीतील. ह्या कादंबरीतील सबंध कथानक एका किंकाळीभोवती गुंफिलेले आहे. ह्या कादंबरीचा नायक एक तरुण, हुशार माणूस आहे. गरीबगुरीब माणसांचे खटले कोर्टात चालवून, त्यांना न्याय मिळवून देणारा म्हणून त्यानं प्रसिद्धी मिळविली होती. गरिबांचा कनवाळू म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला झाला होता. त्याची ही कीर्ती चढत्या कमानीत होती. म्हातार्‍या- कोताऱ्यांना तो मोठ्या आस्थेनं रस्ता ओलांडायला मदत करी. तोही आपल्याला हुशार, लोकांत मानमान्यता पावलेला समजत असे. रस्त्यातून जाताना, किंवा विशेषतः कोर्टाच्या आवारात, त्याला पाहिल्याबरोबर खाली वाकून नमस्कार करणारे, त्याला दुवा देणारे, हा पहा तो अमका अमका,' म्हणून त्याच्याकडे बोट दाखविणारे लोक खूपच होते. तो स्वतःही