पान:Gangajal cropped.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आठ :
'पुनर्जन्माचा बिनतोड पुरावा


 किती हजार वर्षे झाली कोण जाणे, अयोध्येत दिलीप नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला मूल होईना, म्हणून तो व त्याची राणी सुदक्षिणा रानात गुरुगृही वसिष्ठाश्रमाजवळ जाऊन राहिली. ऋषीच्या जवळ नंदिनी नावाची एक गाय होती. रोज रानात जाऊन ती चरत असता राजाने तिचे रक्षण करावे व राणीने तिची सकाळ-संध्याकाळ पूजा करावी, असे व्रत गुरूने सांगितले.

 राजा रोज गायीपाठीमागे रानात जाई. एकदा राजा भोवतालची वनश्री पाहात असताना एका सिंहाने नंदिनीवर झडप घातली. राजा धनुष्याला बाण लावून सिंहाला मारावयाला निघाला, पण त्याच्या हातापायांतली सर्व हालचाल जाऊन एखाद्या पुतळ्याचे जडत्व त्याच्या अंगी आले. मनातल्या मनात तो रागाने जळू लागला. एवढ्यात सिंह त्याला मनुष्यवाणीने संस्कृतात म्हणाला -

 'बाबा राजा, उगीच श्रम घेऊ नकोस. अस्त्राचासुद्धा येथे पाडाव लागणार नाही. वारा जोराने वाहून झाड पाडू शकेल, पण मोठमोठ्या शिळा तो कशा उलथवील?'

 ढवळ्या नंदीच्या पाठीवर बसणाच्या साक्षात शंकराचा मी कुम्भोदार नावाचा अनुचर आहे.

 हे तुझ्या पुढ्यात देवदारूचे झाड दिसते आहे ना, ते पार्वतीमाईने सोन्याच्या घड्याने पाणी घालून स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढविले आहे.

 एकदा कोणा तरी रानपशूच्या अंग घासण्यामुळे ह्या झाडाची साल