पान:Gangajal cropped.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / ६९

खाजगी रीत्या किंवा सार्वजनिक-रीत्या धिक्कार करून भागत नाही. कारण ह्या-ना-त्या उद्योगाने पैसा मिळविणाऱ्या लोकांवर सार्वजनिक धिक्काराचा परिणाम होत नाही. त्यांच्याविरुद्ध शासनसंस्थेचीच मदत घ्यावयास पाहिजे. ह्याउलट एखादा कलाकार आपल्या कलानिर्मितीत उत्कटतेच्या भरात- ती उत्कटता नुसती उपभोगाच्या आनंदाची नसून धिक्काराचीही असू शकेल, लोकांना अश्लील वाटणारी निर्मिती करून गेला. तर धिक्कार हे प्रभावी शस्त्र ठरू शकेल, किंवा त्याची निर्मिती पहिल्या दर्जाची कलाकृती असली, तर लोकांचा धिक्कार हास्यास्पद ठरेल.

 काही झाले, तरी ज्या युगात लोक हजारोंनी, स्त्री, पुरुष, तरुण, मुले- मुली अशी सरसकट-चित्रपटासारखी एखादी गोष्ट नेहमी पाहू शकतात, किवा रेडिओवरची गाणी ऐकू शकतात. किंवा १-२ आण्याला उत्तान भड़क वर्णन वाचू शकतात अशा युगात सर्वांनी मिळून वाचणे, ऐकणे, पाहणे, ह्या कुठच्याच गोष्टीत अतिचार न होण्याची खबरदारी घेतली पाहिजे.

 व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य ऐकावयाला किंवा उच्चारावयाला जितके गोड आणि सोपे. तितकेच आचरणात उतरावयाला दुष्कर आहे. हे स्वातंत्र्य कशाचे? चोरी करायचे, एखाद्याला ठार मारायचे, बायकोचा खून करायचे किवा तिला चोप द्यावयाचे? ह्या बाबतीत स्वातंत्र्य असावे असे म्हटले, तर सर्वच त्या माणसाला वेड्यात काढतील. लहान मुलांना चोरी करावयाला शिकविणे किंवा इतर तर्‍हानी कुमार्गाला लावणे हेही स्वातंत्र्य कोणी कबूल करणार नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी हीच गोष्ट धनसंचय करण्याच्या बाबतीत होती; पण आता कोठचीही राज्यसंस्था व्यक्तीला अनिर्बध धनसंचय करू देत नाही. ह्या गोष्टीमध्ये जितक्या उघडपणे समाजाची बंधने प्रतीत होतात, तितक्या उघडपणे जरी ती इतर गोष्टींत प्रतीत झाली नाहीत, तरी ती असतातच. समाजाला नवी दृष्टी देणाच्या कलाकाराला ही बंधने मोडण्याची इच्छा असली, तर त्याबद्दल होणाच्या दंडालाही त्याने तयार असले पाहिजे व उत्कृष्ट कलाकार ह्याप्रमाणे दंड सहनही करतात. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मूल्यहीनता व सार्वत्रिक बंधमुक्तता, खासच नाही. व्यक्तीच्या व्यवहारावर अति-दडपण नको, ह्यासाठी व्यक्तीची धडपड सदैव चाललेली असते. दुसऱ्या बाजुने व्यक्तीला कह्यात ठेवून समाजाचे नुकसान होऊ नये, अशी समाजाची धडपड चाललेली असते. समाज म्हणजे काही हातात शस्त्र घेऊन भांडणारा विराटपुरुष नव्हे, तर समाजाच्या मूल्यांना