पान:Gangajal cropped.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / २३

ठरविले होते. बेनेटच्या तोंडची वाक्येच्या वाक्ये अनुरूप प्रसंग आला की ते बोलून दाखवीत. आणि असे अनुरूप प्रसंग माझ्या लहानपणी दिवसातून निदान दहा-बारा वेळा येतच. बॅनेटच्या हुशार, फटाकड्या, मानी व उतावळ्या मुलीची भूमिका शकूकडे असे, आणि बेनेटच्या भोळसर, वेडपट व स्वत:ला आजारी समजणार्‍या बायकोची भूमिका सईताईंना बहाल केलेली होती. आपल्या भोवतालच्या माणसांचा भोळेपणा, वेडेपणा, आढ्यता वगैरे लहानसहान दोषांवर बोचक शब्दांमध्ये समर्पक टीका करणे हे मिस्टर बेनेटचे वैशिष्ट्य होते. आणि तशा तऱ्हेची टीका अप्पा घरातील सर्वांच्यावर अधूनमधून करीत असत. ह्या टीकेचे आम्हा मुलींना त्या वेळी काही वाटत नसे व अजूनही काही वाटत नाही. सईताईंना कधीमधी ही टीका झोंबत असे, असे मला आता आठवते.
 प्राईड अँड प्रेज्युडिस'च्या जोडीला नेहमी वाचलेली दुसरी कादंबरी म्हणजे ‘मॅन्सफील्ड पार्क.' तीत सर टॉमस नावाच्या सदाचरणी, कर्तव्यतत्पर मुलाच्याबद्दल महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका मनुष्याचे चित्र रेखाटलेले आहे. त्याच्या घरी एक मुलगी रहायला आणलेली होती. ती आपली भित्री व रडूबाई असायची. ह्या भिऊन-भिऊन वागणाच्या फॅनीची भूमिका मला दिलेली असे. सर टॉमसच्या घराची व्यवस्था ही त्याची स्वतःची बायको आळशी व भोळसट असल्यामुळे बायकोची थोरली बहीण पाहत असे. ही बाई सर टॉमसच्या पै-पैला जपणारी, सर टॉमसच्या मुलींचे लाड करणारी व फॅनीला छळणारी अशी होती. ह्या मिसेस नॉरिसचे नाव बिचार्‍या वहिनींना बहाल केले होते. जेन ऑस्टेनच्याच जोडीला गोल्डस्मिथही अप्पांचा फार लाडका. त्याची ‘व्हिकार ऑफ वेकफील्ड' ही कादंबरी आम्ही दोन-चारदा तरी वाचली असेल, तीतल्या भूमिका कोणाला बहाल झाल्या नसल्या; तरी तीतली वाक्येच्या वाक्ये प्रसंगानुसार अप्पा म्हणत असत. तरुण शाळकरी मुलींच्या निरर्थक गप्पा कधीकधी चालतात, तशा एकदा शकू व मी बोलत असता अप्पा शेजारच्या खोलीतून ('व्हिकार ऑफ वेकफील्ड' मधल्या बचेंलप्रमाणे) नुसते जोरात ‘फज’ (Fudge) असे म्हणाले. आम्ही भानावर आलो, हसलो व निरर्थक बडबड बंद केली.
 अप्पांच्या घरी शब्दकोशाचा उपयोग सारखा करावा लागे. शब्दांचा अर्थ, उच्चार व कळेल तेथे ज्या लॅटिन, ग्रीक, अँग्लोसॅक्सन किंवा जर्मन धातूपासून तो बनला असेल, त्याची चिकित्सा इतका खटाटोप करावा