पान:Gangajal cropped.pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १५७


जातो. पण तो कथेसारखा दिसला, तरी कथा नसतो. ते एक चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते. वेगवेगळ्या पातळ्यांवरून, वेगवेगळ्या दिशेने सतत चिंतन करणारे आणि जीवनाचा अर्थ लावणारे अखंड प्रवासी, भटके मन, युगानुयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करीत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य हा ह्या प्रवाशाच्या संवेदनक्षम मनाचा एक विभ्रम आहे. एका सुसंस्कृत मनाचा हा सतत जिवंत असलेला अनुभव शब्दबद्ध करणारा सश्रद्ध प्रवास आता कायमचा थांबलेला आहे.

- नरहर कुरुंदकर