पान:Gangajal cropped.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १३९


कितीही वाईट का असेना. जे मिळते त्यावर समाधान नसते, मग ते कितीही चांगले का असेना. हा अप्राप्याचा हव्यास ही माणसाची प्रवृत्ती आहे. हे फडक्यांचे प्रस्तुत. मग जिव्हाळ्याने फडके सांगू लागतात की, 'माझ्या मित्राकडे गोजिरवाणी अशी दोन लहान मुले आहेत. त्यामुळे त्याच्या घरात आनंद बहरलेला आहे. मी मित्राकडे जातो, तेव्हा मुलांच्यासाठी काही घेऊन जातो. एकदा खेळण्यातल्या दोन आगगाड्याच मी नेल्या. यापुढचा फडक्याचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे दोन्ही आगगाड्या सारख्याच होत्या. एक याला दिली, एक त्याला दिली, पण लवकरच दोघेही भांडू लागली. कारण प्रत्येकाला आपल्याला मिळालेले खेळणे हिणकस वाटत होते. ज्या प्रस्तुताकडे जाण्यासाठी हे अप्रस्तुत आहे, त्याला मुले दोनच असणे, खेळणी सारखी असणे हे आवश्यक होते. दोन्ही खेळणी मला एकट्यालाच हवी, असा हट्ट धरणारे मूल फडक्यांच्या दृष्टीने सोयीस्कर नव्हते. शेवटी फडक्यांचाही लघुनिबंध कोणतातरी मुद्दा पटवून देण्यासाठीच आहे. बोध अगर उपदेश हे वाङमयाचे प्रयोजन नव्हे; कला ही शुद्ध कलेसाठी आहे: असा नित्य उद्घोष करणा-या फडके यांच्या गुजगोष्टींचे स्वरूप मात्र प्राधान्याने उपदेशप्रधान, म्हणजे हा किंवा तो मुद्दा पटवून देण्यासाठी निबंध- असे आहे.

 ही अडचण फडके किंवा खांडेकर यांची नव्हती. दोघांच्याही डोळ्यांसमोर आदर्श म्हणून असणा-या गार्डिनरच्या निबंधांचे स्वरूप असेच होते. कारण तोही गोष्टीवेल्हाळपणे कोणता-ना-कोणतातरी उपदेश इंग्लंडच्या जनतेला करू पाहत होता. त्याचाही प्रत्येक निबंध कोणत्यातरी मुद्दयाच्या सिद्धीकडेच जात होता. मुद्दा सांगण्यासाठी निबंध, विचार गळी उतरविण्यासाठी निबंध, हे जे निबंधाचे मूळ रूप त्याला गोष्टींची जोड दिल्यामुळे तो उपदेश शास्त्राप्रमाणे कठोर राहिला नाही. पण उपदेश कांतासम्मित झाला, तरी त्याची मूळ प्रवृत्ती उपदेशाचीच आहे. काणेकरांच्या विरोधाभासात्मक मांडणीमुळे हे उपदेशप्रधान स्वरूप चटकन जाणवत नाही. त्यांचे संवादकौशल्य, त्या निबंधात असणारा अवखळ विनोद, गणूकाकांची रमणीय व्यक्तिरेखा या सगळ्यांनी मन जिंकले, तरी तोही निबंध शेवटी मुद्दा पटवून देण्यासाठीच आहे. त्यातील उरलेल्या सर्व बाबी सजावटीच्या आहेत. आपण मुद्दा पटवून देत आहो, एक विचार वाचकांच्या मनात पेरीत आहो, हे वाचकांच्या लक्षात येऊ नये, म्हणून कधी