पान:Gangajal cropped.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
'थोडे' मैत्रिणीसंबंधी


 गंगाजल' हे इरावतीबाईंचे ललित-निबंधांचे पुस्तक त्या गेल्यानंतर वर्षाने प्रकाशित होत आहे.

 पुस्तकाचे नाव बाईंनी ठेविले नसून ते मी ठेविले आहे. पुस्तक बाईंचे, व नाव मी ठेवणार हे थोडेसे विचित्र वाटले, तरी माझ्या ष्टीने त्याला फार अर्थ आहे. बाई असत्या तरीही कदाचित पुस्तकाला मीच नाव ठेविले असते.

 ह्या ललित निबंधांच्या पुस्तकाला प्रा. कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी प्रस्तावना लिहिल्यानंतर परत मी काहीतरी लिहिण्याची जरूरी नव्हती; परंतु प्रा. कुरुंदकरांनी बाईंचे मराठी ललित निबंधांतील स्थान सांगण्यापुरताच या लेखांचा परामर्श घेतला. ह्या निबंधांबद्दल प्रा. कुरुंदकर मौनच स्वीकारतात

 या पुस्तकातील सर्व ललित-निबंधांमागे बाईंचे सतत जागृत असणारे मन त्याना जीवनात येणारी अनुभूती यांचे एक सूत्र आहे. त्या सूत्राचा किंवा चिंतनाचा विचार जास्त स्पष्ट व्हावयास पाहिजे होता.

 हे सूत्र मला यशस्वीरीत्या सांगता येईल, असे नाही. पण मी प्रयत्न करणार आहे.

 साधारणपणे १९५२ पासून बाईंनी जे ललित निबंध लिहिले, त्या निबंधांचे विषय पुष्कळसे आमच्या दोघींच्या बोलण्यात येऊन जात.

 अशा त-हेची चर्चा त्या आणखीही कुणाजवळ करीत असतील. पण त्यांच्यापैकीच मीही एक आहे. हे लेख निरनिराळ्या स्वरूपातून जाताना,