पान:Gangajal cropped.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२० / गंगाजल


हरिणांचा भित्रेपणा, कुत्र्यांची लाचारी, डुकराची हाव, माकडाचा खट्याळपणा, सर्व काही त्यात असतं. ज्या घटनांबद्दल किंवा माणसांबद्दल तिरस्कार वाटतो, त्यांच्या कृत्यांचं एक मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मन हळूच कौतुक करीत असतं. एकाच शरीरात अशी दोन मनं असतात. सामान्य माणसांच्या व्यवहारात बहुतेक एका मनाचं चित्र उमटलेलं दिसतं. दुसरं दबलेलं असतं, पण काही प्रसंगी ते मन उफाळून येतं, आणि एकच माणूस देवाची, आणि दैत्याची अशा दोन्ही परस्परविरोधी भूमिका उमटवीत असतो. पाश्चात्यांच्या कथा-कादंबऱ्यांत कथानकाला रंग भरण्यासाठी ह्या तत्वाचा उपयोग केला गेला आहे. पहिल्या भेटीत ज्याच्याबद्दल गैरसमज घृणा किंवा द्वेष, त्याबद्दल शेवटी आत्यंतिक प्रेम अशी कलाटणी बऱ्याच कथा कादंबऱ्यांत दिसते. आपल्याकडे भक्तिमार्गी लिखाणात व तत्वज्ञानात ह्याचा विचार फार खोल केला आहे; पण इतर वाङ्मयप्रकारात तो दिसत नाही. भक्तिवाङमयात विरोधभक्ती म्हणून एक प्रकार सांगितला आहे. देवाचे आत्यंतिक विरोधी व वैरी असलेल्या लोकांची मने सूडापायी इतकी देवमय होतात की, तेही शेवटी देवाला जाऊन पोहोचतात, असे सांगितले आहे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्राह्मी स्थिती प्राप्त व्हायची, म्हणजे संपूर्ण समता अंगी बाणली पाहिजे. समता म्हणजे राग नाही, लोभ नाही, घृणा नाही, आसक्ती नाही, प्रेम नाही, द्वेष नाही. पाणी गायीला आणि वाघाला सारखंच असतं. 'गायीची तृषा हरू,वाघ्रा विष होऊनि मारूं' असं ते करीत नाही. सूर्य रावरंक म्हणत नाही. ती समता; तीच अलिप्तता. एका दृष्टीनं सर्व आपणच व दुसऱ्या दृष्टीने आपण कशातच नाही, अशी ही वृत्ती. ह्या सर्वांचा विचार केला, म्हणजे विरोध-आत्यंतिक विरोध- म्हणजे नुसता सामाजिक नव्हे, तर वैयक्तिक संबंध व लागेबांधे ह्यामुळेच उत्पन्न होतो. त्या विरोधामध्येसुद्धा आत्मीयता आहे, ह्याची प्रचीती येते. प्रेम आणि द्वेष ही एकाच आत्म्याची दोन रूपं आहेत -"

 मनाला पुढे जाववेना. ते विचार करायचे थांबले.

 एकदा ठेच लागली, म्हणजे परत-परत तिथेच ठेच लागते. तसे माझे झाले. एक पाहुणे घरी आले होते. ते मला म्हणाले, "मी एक फारच छान पुस्तक वाचतो आहे-तुम्ही अवश्य वाचाच.' मी ते घेतले. ते होते शायरर् चे हिटलरच्या उदयास्ताबद्दलचे. मी वाचायला घेतले. काही गोष्टी माहीत होत्या, तरी त्या नव्याने मांडल्या होत्या. जर्मनीत हिटलरचा उदय का बरे