पान:Gangajal cropped.pdf/106

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ११३

  एखादी गोष्ट हातात घेतली की, बुद्धी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा पाठपुरावा करायचा, मध्ये थांबायचं म्हणून नाही; अगदी शेवटाला जायचं, हा जर्मन लोकांचा गुण आहे. रस्त्यावर खडी चेपणारा रूळ असतो ना, तसं त्यांचं आहे. तोच अजस्त्रपणा, तोच संथपणा, तोच एकमार्गीपणा, तोच अटळपणा आणि तेच सामर्थ्य, हायडेगरने माझा आत्मा पार भुईसपाट करून टाकिला.

१९६८