Whereand When: स्थळ आणि तारीख.
H- Habitat: निवासस्थान, म्हणजे नेमका कुठे दिसला ते स्थळ. उदा. जंगल, कुरण, खारफुटी इ.
I- Impression: विश्रांती घेतोय की हालचाल करतोय. पक्षी बघताच तुम्हाला काय वाटले.
C-Comparison and Count: चिमणी, मैना, कावळा, घार, कोंबडी ह्या सामान्य पक्ष्यांशी तुलना करा (आकार). तसेच एकूण किती पक्षी दिसले ते नोंदवा.
H-Habit: सवयी (उदा. शेपटी हलवितो, जमिनीवर धावतो इ.)
I- Identification: विशेष चिन्हे - अंगावरील पट्टे, रेघा, ठिपके नोंदवा.
S-Sound: पक्ष्यांचा आवाज ऐका. शक्यतो शब्दांकित करा (उदा. हुदहुद पक्ष्याचा आवाज हु पो हु-पो-पो' असा लिहिता येतो).
I- Important Details: पाय, बोटे, चोचीचा आकार, रंगाचा तपशील वगैरे.
T- Tail and wings: आकार, लांबी आणि रचनेची वैशिष्टे द्या (उदा. शेपटी खूप लांब, शेपटी अगदीच आखूड, पंख शेपटीपेक्षा लांब, इ.).
पक्षी निरीक्षणाचे साहित्य
पक्षी निरीक्षणाला जाताना स्थानिक पक्ष्यांसंबंधीचे पुस्तक, पेन व नोंदवही सोबत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण नेमके काय बघितले त्याची ओळख पटवून त्याची टिपणं ठेवणे सोपे जाते. स्थानिक पक्ष्यांसंबंधीचे कुठले पुस्तक घ्यावयाचे ह्याकरिता एखाद्या जाणकार मित्राचा सल्ला घ्यावा.
दुर्बीण
साध्या डोळ्यांनी जरी पक्षी निरीक्षण करता येत असले तरी एक द्विनेत्री अथवा दुर्बीण सोबत असल्यास आपली निरीक्षणे आणखी चांगली होतात. आपल्याला साधारणतः ८x४० अथवा १०x५० वर्धनक्षमतेची (Magnification Power) दुर्बीण पक्षी निरीक्षणाला योग्य असते. ८x४० ह्यामधील पहिला अंक वस्तू आपल्याला आठपट जवळ दिसते हे सांगतो तर ४० हा
अंक दुर्बिणीच्या समोरील भिंगाचा व्यास दर्शवितो.