पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


पिवळ्या पायाची हरोळी
(छाया: डॉ. तारिक सानी)

मराठी नाव: पिवळ्या पायाची हरोळी.

इंग्रजी सामान्य नाव: Yellow-footed Green-Pigeon (जुने नाव- (Yellow-legged

Green-Pigeon). शास्त्रीय नाव: Treron phoenicopterus. लांबी: ३३ सेंमी. आकार: पारव्याएवढा. ओळख: आकारानी मोठी हरोळी. करडी टोपी आणि कपाळ हिरवट पिवळे. रूंद हिरवट पिवळी गळपट्टी. वरील बाजू करडी-हिरवी. खांद्यावर फिक्कट जांभळा छप्पा. शेपटीचे बुड पिवळसर. पाय व बोटे पिवळी. वृक्षनिवासी. आवाज: मंजुळ शिळ घातल्याप्रमाणे कुंजन. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानझडीचे जंगल, ग्रामीण भाग आणि शेती प्रदेश. वडा-पिंपळाच्या झाडांवर थव्याने दिसतो. खाद्यः फलाहारी. वडा-पिंपळाची रसाळ फळे विशेष प्रिय तसेच इतर छोटी फळे.

६१